जि. प. प्राथमिक शाळा सलगरा येथे महापरिनिर्वाण दिनी करण्यात आले अभिवादनसलगरा,दि.६(प्रतिनिधी)

तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगरा (दि.) येथे ६ डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक डी.व्ही. खांडेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी एस.बी. इंगळे, भोसले जि.व्ही. चव्हाण पी.डी., भक्ते एस.वाय.लोभे जि.ए.,  पोपळभट के.सी. ढवारे ए.के., बिराजदार एस.पी. आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post