दैनिक जनमत : कळंब तालुक्यातील 28 गावांतील शेत, पाणंद रस्त्यांच्या कामांना मान्यता

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Saturday, January 29, 2022

कळंब तालुक्यातील 28 गावांतील शेत, पाणंद रस्त्यांच्या कामांना मान्यता

 


30 किलोमीटर लांबीचे होणार रस्ते; आमदार कैलास पाटील यांची माहिती


उस्मानाबाद ः मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/ पाणंद रस्ते योजनेअंतर्गत कळंब तालुक्यातील 28 गावांतील शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामासाठी राज्य सरकारच्या नियोजन विभागाने (रोहयो प्रभाग) मंजुरी दिली आहे.त्याबद्दल रोहयो मंत्री श्री संदीपानजी भुमरे साहेब,शिवसेना संपर्कप्रमुख माजी मंत्री डॉ. प्रा. आ. तानाजीराव सावंत साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री मा. ना.श्री शंकररावजी गडाख-पाटील साहेब, खासदार श्री ओमप्रकाशजी राजेनिंबाळकर यांच्या प्रयत्नातून या गावांतील 30 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश करण्यात आल्याचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सांगितले.

मनरेगा आणि राज्य रोहयो यांच्या अभिसरणातून मातोश्री गामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते ही योजना राबविण्यात येणार आहे. शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांकरिता पूरक कुशल निधी राज्य रोहयोअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानुसार कळंब तालुक्यातील 28 गावांतील शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना नियोजन विभागाने (रोहयो प्रभाग) मान्यता दिली आहे. या 28 गावांमध्ये 30 किलोमीटर लांबीचे शेत/ पाणंद रस्ते होणार आहेत. अनेक गावांतील शेतकऱ्यांकडून शेतरस्त्यांची तर ग्रामस्थांकडून पाणंद रस्त्यांच्या दुरूस्तीची मागणी वारंवार केली जात होती. शेतरस्ते, पाणंद रस्ते सुस्थितीत नसल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शेतकरी व ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी अशा गावांतील शेतरस्ते, पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार नियोजन विभागाने मान्यता दिली आहे. त्यामध्ये कळंब तालुक्यातील 28 गावांतील शेत/ पाणंद रस्त्यांना सरकारने मंजुरी दिली आहे. यातून 30 किलोमीटरचे रस्ते होणार आहेत, अशी माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली.

वारणावती येथील वन्यजीव कार्यालय परीसरात नरक्याच्या गोडाऊनला संशयास्पद आग

 करोडो रुपयांचा नरक्या व तीन वाहने आगीत जळून खाक; वन्यजीवच्या निष्क्रियतेचा कळस ! शिराळा दि. ०१(प्रतिनिधी) याकुब मुजावर                वारणा...