वालवड जि.प.प्रशालेत "अनुभवकथन" कार्यक्रम, गुणवंतांचा सत्कार संपन्न


 वालवड (बाबासाहेब नाईक)

         भूम तालुक्यातील मौजे वालवड येथील जि.प.प्रशालेत आज "अनुभवकथन" कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

        या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ शेळके व प्रमुख पाहुणे म्हणून मेजर पवार एस.एन हे उपस्थित होते. तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे नुतन निर्वाचित अध्यक्ष मा. संतोष बाबर साहेब उपस्थित होते. या सर्वांचा सत्कार शालेय शिक्षकांकडून करण्यात आला तसेच सन 2021 मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले गुण मिळवून जिल्ह्यात उत्तीर्ण होत शिष्यवृत्ती धारक झालेला कु.अनिकेत बाबासाहेब नाईक याचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला.

         "अनुभवकथन" या विषयावर बोलताना मेजर ( माजी सैनिक ) मा. श्रीराम पवार साहेबांनी आपल्या आर्थिक परिस्थितीशी दोन हात करत कसे शालेय शिक्षण घेतले, सन १९८५ साली आर्मीत शिपाई पदावर भरती होत मेजर पदा पर्यंतचा प्रवास सांगत उपस्थित विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेऊन शालेय शिक्षण घेत असताना येणाऱ्या आर्थिक संकटातून मार्ग काढत आपले करिअर अस घडवता येते या बाबत मार्गदर्शन केले, व कोरोना , आणि ओमायक्रोन या संसर्गजन्य आजारा विषयीव घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली.

       यावेळी शालेय शिक्षक मुख्याध्यापक खरात एल.व्ही , जठार पी.आर , खुने आर.आर , पठाण एस.के , नदाफ एम.एन , वाघमारे ए.एस , चौधरी बी.एस , श्रीमती.भोसले एम.जे , श्रीमती.सुरवसे एम.जे , श्री.दहीहंडे ए. डी , गवळी बी.आर व हे उपस्थित होते.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठाण सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री.वाघमारे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेचे काम शिपाई हातमोडे यांनी केले

No comments:

Post a Comment