Sunday, January 16, 2022

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपीस यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा येथे अटक

 परंडा पोलीस पथकाची धडाकेबाज कार्यवाही,सायबर सेलची मदत आली पथकाच्या कामी


६०० कि.मी.अंतरावर असणारी पडित व आरोपी दोन दिवसात परंडा पोलीसांच्या ताब्यातपरंडा ( दि.१६ जानेवारी ) : परंडा तालूक्यातील आवारपिंपरी परिसरातील चौधरी वस्ती येथील एका अल्पवयीन मुलीस दि.१० जानेवारी रोजी रात्री लग्नाचे आमीष दाखवुन पळवुन नेहल्या प्रकरणातील आरोपी सावन पवार यांस पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलिसांच्या पथकाने सायबरसेलच्या मदतीने अथक परिश्रम घेऊन दोन दिवसात यवतमाळ जिल्ह्यतील वर्धा थेथे अटक केली आहे.

        अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी परंडा पोलीस स्टेशन येथे  दि. ११ जानेवारी रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.प्रकरणाचे गांभिर्य ओळखुन या प्रकरणातील पीडीतेचा व आरोपीचा शोध लावण्यासाठी परंडा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांनी पोना रमेश सिरसागर व पोना शेवाळे यांचे पथक तयार करून या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यासाठी त्यांना महत्वाच्या सुचना देऊन पीडीतेच्या व आरोपीच्या शोधासाठी पाठविण्यात आले.आरोपींची प्राथमिक माहिती काढली असता आरोपी पिडित मुलीसह‌ यवतमाळ जिल्ह्यात असल्याची  पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे यांना माहीती मिळाली. माहितीच्या अनुषंगाने यवतमाळ येथे तपास पथक रवाना करण्यात आले. आरोपीच्या लोकेशन वरून पोना रमेश क्षिरसागर व पोना शेवाळे यांनी यवतमाळ येथे पीडीतेचा व आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी झाडाझडती घेतली. मात्र आरोपी सारखा ठिकाणा बदलत असल्याने आरोपी हाती लागत नसल्याची माहीती पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांना पथकाकडून वेळोवेळी दिली जात होती.

        प्रकरण गंभीर असल्याने आरोपीच्या शोधा साठी पोलिस अधिक्षक निवा जैन, अप्पर पोलिस अधिक्षक उपविभागीय पोलिस आधिकारी डंबाळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या नेतृत्वा खाली सहाय्यक पोलिस निरिक्षक एकशिंगे, पोना विशाल खोसे यांच्या संपर्कात राहुन तपास पथकाचे पोलिस नाईक रमेश क्षिरसागर व पोना शेवाळे यांनी सायबर सेलच्या मदतीने आरोपीच्या लोकेशन वरून त्याच्या सततच्या हालचाली जाणून घेतल्या जात होत्या.दोन दिवस पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या सावन सुदाम पवार या आरोपीस तिसऱ्या दिवशी वर्धा शहरातून अटक करण्यात पोलिस पथकाला सायबरसेलच्या मदतीने यश मिळाले.आरोपीच्या तपास कामी परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे, सहाय्यक पोनि एकशिगे,सहायक पोनि हिंगे,सहाय्यक पोनि ससाने,पोना विशाल खोसे, महिला पोना पायाळ, पोकॉ कळसाईन यांचे पथकाला वेळोवेळी मागदर्शन मिळाल्यामुळे ६०० किमी अंतरावर असणाऱ्या या प्रकरणातील आरोपी व पीडित मुलीला ताब्यात घेण्यात पोलिस पथकाला यश मिळाले.या तपास पथकातील प्रमुख पोलिस नाईक रमेश क्षिरसागर हे मुंबई पोलिसात कार्यरत असताना त्यांनी अनेक मिसींग,अपहरण प्रकरणचा तपास लावून आरोपींना परराज्यातुन अटक केलेली आहे.मुंबई येथील तपास कामाचा दांडगा अनुभव रमेश क्षिरसागर यांना या प्रकरणातील पीडीत व आरोपी यांचा शोध घेण्यासाठी कामी आला.


चौकट... परंडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी रमेश क्षिरसागर व शेवाळे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा येथे जाऊन आरोपींचा शोध घेऊन त्यांस ताब्यात घेतले.पिडित अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली.आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास करण्यात येत आहे.

      सुनिल गिड्डे,पोलिस निरीक्षक,परंडा.


चौकट..... परंडा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली आरोपींचा शोध घेण्यात आला.आरोपी सतत ठावठिकाणा बदलत असल्याने अडचणी येत होत्या योग्य तंत्रज्ञानाचा उपयोग करून सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली.

        रमेश क्षिरसागर,

पो.ना.परंडा.

माजी सभापती विनायक आबा विधाते यांचे निधन

  कारी - ( प्रतिनिधी) - तालुक्यातील कारी येथील प्रगतशील शेतकरी,बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती विनायक (आबा) अनंत विधाते (वय ७५)यांचे अल्पश...