Monday, January 17, 2022

आरोपीने दिल्या पोलिसांच्या हातावर तुरी

उस्मानाबाद -

 सुंभा, ता. उस्मानाबाद येथील अजय व सुनिल श्रावण शिंदे उर्फ काळ्या, या दोघा भावांस बेंबळी पोलीसांनी घरफोडीच्या गुन्हा क्रमांक- 210/ 2021 मध्ये अटक करुन उस्मानाबाद न्यायालयात काल दि. 16.01.2022 रोजी सादर केले होते. त्यांस न्यायालयीन कोठडीकामी उस्मानाबाद कारागृहात ठेवण्याचा आदेश झाल्याने कारागृहात भरती करण्यापुर्वी त्यांची उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात 13.45 वा. प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. यावेळी सुनिलच्या स्वाक्षरी व अंगुलीमुद्रेचा ठसा घेण्याकामी त्याची हातकडी पोलीसांनी काढली असता तो पोलीस हेडकॉन्स्टेबल- अभिमन्यु घोडके यांच्या हातातून आपला हात झटका देउन सोडवून फरार झाला.