दैनिक जनमत : सावरगावात कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Sunday, January 30, 2022

सावरगावात कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

सावरगाव प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील तात्यासाहेब हनुमंत वायकर (वय,३०)यांनी कर्जबाजारीपणा आणि सततची नापिकी व गेल्यावर्षी कोरोना संसर्गजन्य रोगामुळे द्राक्ष बागेचे झालेले नुकसान या विवंचनेतून त्यांनी दहिवडी रोड नजीक असलेल्या त्यांच्या शेताजवळील तलावाजवळ विषप्राशन करून आत्महत्या केली.या घटनेची माहिती मिळताच तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घुले यांनी घटनास्थळी  पंचनामा केला,आत्महत्याग्रस्त तरुण शेतकरी तात्यासाहेब वायकर यांनी अतिशय कष्टाने दोन एकर द्राक्ष बाग जोपासली होती ,परंतु गेल्या वर्षी कोरोना संसर्गजन्य रोगांमुळे बाजारपेठा बंद राहिल्या यामुळे द्राक्ष बांधावर टाकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली होती, यातूनच त्यांना आर्थिक फटका बसला होता, यामुळे बँकांचे सावकारांचे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलून विषप्राशन  करून आत्महत्या केली,सर्वांशी आपुलकीने बोलणारा प्रामाणिक, कष्टाळू तरुणाच्या मृत्यू मुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, त्यांच्या पश्चात आई, वडील ,पत्नी, लहान मुलगी, भाऊ असा परिवार आहे