तोतया पोलिसाने फसवले ; अर्ध्या तोळ्याची अंगठी लंपास

 उस्मानाबाद - जिल्ह्यात तोतया पोलिसांचे पेव फुटले आहे. उस्मानाबाद शहरातील एम आय डी सी परिसरात वयस्कर व्यक्तीला पोलीस आहे सांगून, गांजा ची तस्करी केली आहे का ते तपासण्यासाठी झडती घेऊन अंगठी लंपास करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. 

याबाबत माहिती अशी की, वकील कॉलनी, उस्मानाबाद येथील पुरोहीत- चंद्रकांत रामचंद्र महाजन हे  दि. 13.01.2022 रोजी 13.00 वा. सु. उस्मानाबाद एमआयडीसी मधील एका रस्त्याने जात होते. यावेळी एका मोटारसायकलवरील एका अनोळखी पुरुषाने पोलीस असल्याची बतावणी करुन चंद्रकांत यांना त्यांच्या हातातील अंगठी रुमालात बांधून खीशात ठेवण्यास सांगीतले. यावर चंद्रकांत यांनी त्या पुरुषास आपली 5 ग्रॅम वजनाची सुवर्ण अंगठी व रुमाल दिला असता त्याने ती अंगठी रुमालात गुंडाळल्याची हातचलाखी करुन फक्त गुंडाळलेला रुमाल चंद्रकांत यांना देउन ती अंगठी घेउन निघून गेला. थोड्या वेळाने चंद्रकांत यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अशा मजकुराच्या चंद्रकांत महाजन यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 419, 170 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

No comments:

Post a Comment