पाच राज्यांच्या निवडणुका, ध्रुवीकरण करण्यासाठी निर्णय असल्याचा आरोप
उस्मानाबाद -
कर्नाटक सरकारने शाळा व महाविद्यालयामध्ये ड्रेस कोड कायद्याअंतर्गत मुलींना शाळा व महाविद्यालयामध्ये परीधान करणेवर बंदी आणल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद मधील मुस्लिम बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. तसेच पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने ध्रुवीकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, मागील जानेवारी महिन्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये उडपी येथील पी.यु.काॅलेजमध्ये ड्रेस कोड च्या नावाखाली मुस्लिम मुलींना हिजाब घालून महाविद्यालयामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. कर्नाटक सरकारने ड्रेस कोड करून शाळा काॅलेजमध्ये प्रेवश करण्यास मनाई करणे हे घटनेच्या कलम २५ नुसार मिळालेल्या मूलभूत हक्काची पायमल्ली करणारा कायदा आहे.भारतीय घटनेनुसार मिळालेल्या अधिकारानुसार धार्मिक मूलभूत गोष्टी श्रद्धा व परंपरा जपण्याचा व आचरणात आणण्याचा अधिकार आहे त्यामुळेच इस्लाम धर्मानुसार व श्रद्धेनुसार हिजाब परिधान करणे सुद्धा हे मौलिक अधिकारात येते आणि ते कोणत्याही कायद्याद्वारे कोणत्याही राज्याला हिरावून घेऊ शकत नाही कर्नाटक मधील जातीवादी सरकारने विद्यार्थ्यांमध्ये हिजाबवरून विष पेरण्याचे काम केले आहे ते समाजाला व देशाला परवडणारे नाही याची तीव्रता वाढण्याआगोदर राष्ट्रपतींनी वेळीस कर्नाटक सरकारच्या या निर्णयामध्ये हास्तक्षेप करून येथील पारित करण्यात आलेला कायदा रद्द करून तेथील मुस्लिम मुलींना घटनेनुसार मिळालेल्या व मुस्लिम धर्मानुसार हिजाब परिधान करण्याचा अधिकार बहाल करण्यात यावा अशी मागणी केली आहे या निवेदनावर मसूद शेख,समीयोद्दीन मशायक,निजामोदीन मुजावर,वाजीदखान पठाण, मोहसीन शेख,जमीर शेख,जकर शेख,एजाज काझी,असलं पठाण,इमीयाज बागवान, इस्माईल शेख,खादर खान, अय्युब सय्यद,अमजद पठाण,साबेर शेख,मुजीब काझी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.