सारोळ्यात अवैध दारू विक्रीला ऊत; राज्य उत्पादन शुल्कची एकावर कारवाई

 


 पारा( राहुल शेळके ): वाशी तालुक्यातील सर्वच अवैध ढाब्यांवर देशी व विदेशी दारू विक्रीला ऊत आला आहे. यामुळे परमिट रूम, देशी दारू दुकान यांच्या विक्रीवर परिणाम होत आहे.  त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सर्वच अवैध दारू विक्री वर सध्या धाडसत्र सुरू आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील अधिकारी सतर्क राहून सदर मोहिमेत भरीव कामगिरी करत आहेत.

        यातच दिनांक 12 फेब्रुवारी रोजी गुप्त बातमीदार यामार्फत पथकाला मिळालेल्या माहितीनुसार वाशी तालुक्यातील सारोळा (मां) येथील होटेल योगेश मध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्री होत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क चे एका पथकाने हॉटेल योगेश वर छापा मारला असता आरोपी मेघराज शेषराव मोरे वय 30वर्ष या इसमाच्या ताब्यातून देशी व विदेशी ज्याची अंदाजे किंमत 18850 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

       सदर गुन्ह्यात मिळून आलेले आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून सदरची कार्यवाही विजय चिंचाळकर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली भीमराव ओव्हाळ दुय्यम निरीक्षक भूम यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क पथक करत आहेत.

1 comment:

  1. Really tragic case that someone so poor has to deal with a excise raid whilst big fish kajole their way through with such instances. Bribery for licenses is a big deal.

    ReplyDelete