डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे काक्रंबा येथे स्वच्छता अभियान


सलगरा,दि.१ (प्रतिनिधी) : 

पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान  राबविण्यात आले.

म्हणुन त्याच पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे आज दि.१ मार्च रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले, काक्रंबा येथे घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात शासकीय कार्यालये, रुग्णालये, स्मशानभूमी, शाळा, यांचा समावेश होता. सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत अभियान पार पडले. या अभियानात हजारो श्रीसदस्यांनी कोरोना नियमांचे पालन करत हातात ग्लोज, मास्कचा वापर करत अभियान यशस्वी केले. या वेळी या अभियानातून ५० ते ६० टन कचरा जमा करून श्री सदस्यांनी कचऱ्याची विल्हेवाट  लावली.No comments:

Post a Comment