दैनिक जनमत : वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यापासून मानधन थकीत, आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Wednesday, March 2, 2022

वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यापासून मानधन थकीत, आंदोलनाचा इशारा

 


उस्मानाबाद - वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यापासून मानधन थकले असून जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने अधिक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. परिपत्रक क्र. ५३६ प्रमाणे कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करुन ऑक्टोबर २०२१ पासून आजपर्यंतचे पेमेंट कामगारांच्या बँक खात्या जमा करण्यात यावे. वरिष्ठ कार्यालयाकडून आपणांस कोर्ट केस मधील जॉब सिक्युरिटी प्राप्त झालेल्या कंत्राटी कामगारांना तात्काळ कंत्राटदारांकडून पुढील नियुक्ती आदेश देण्यात यावा, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वीज कंत्राटी कामगारांसाठी ईएसआयसी पॉलीसी चालू झाली असल्यामुळे नवीन कंत्राटदार / एजन्सीकडून पॉलीसी चालु करण्यात यावी,दि.०१ जानेवारी २०२२ पासून शासनाने निर्धारित केलेली किमान वेतनवाढ त्वरीत लागू करण्यात यावी.कामावर कार्यरत जुने व अनुभवी कंत्राटी कामगारांना तात्काळ नियुक्ती आदेश नवीन एजन्सीकडून देण्यात यावेत,

नवीन कंत्राटदारांकडून / एजन्सीकडून प्रति कंत्राटी कामगार रु.२०,०००/- प्रमाणे नियुक्तीसाठी (ऑर्डरसाठी) घेतले जात आहेत. तसेच नवीन बिगर अनुभवी (बोगस आय.टी.आय. प्रमाणपत्र ) कामगारांकडून ३०-४० हजार रुपये घेवून ऑर्डर देण्यात येत आहेत. तरी तो भ्रष्टाचार त्वरीत थांबविण्यात यावा,सर्व वीज कंत्राटी कामगारांचा विमा व पी.एफ. मुदतीत भरण्यात यावा.महावितरणच्या सांधिक कार्यालयाकडून निर्गमीत झालेल्या २३८८० परिपत्रकाप्रमाणे कंत्राटी कामगारांना सुरक्षा साधने देण्यात यावीत.मागील कंत्राटदार डी.एम. दहिफळे यांच्या एजन्सी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केलेल्या वीज कंत्राटी कामगारांना अद्याप पर्यंत कामावर घेतलेले नाही. तरी त्यांना तात्काळ कामावर घेण्यात यावे.

 नवीन कंत्राटदारांना उस्मानाबाद जिल्ह्यातील दिलेल्या कार्यक्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या यादी संघटनेस देण्यात यावी,या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुनील उपळकर, जिल्हा सचिव सचितानंद भराटे, जिल्हा कोषाध्यक्ष मारुती गुंड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मिळाली ३ कोटींची थकहमी

  धाराशिव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. उस्मानाबाद, नांदेड व मुंबई या बँकांनी सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासना...