लोकसेवकास धाक दाखवणा-यावर गुन्हा दाखलसलगरा,दि.१७ (प्रतिनिधी)

सलगरा दिवटी येथे विज बिल थकबाकी वसुली करण्यासाठी शाखा कार्यालय तुळजापुर ग्रामीण - अंतर्गत जनमित्र ज्ञानेश्वर भास्कर काटे, गणेश संभाजी सातपुते, श्रीकांत राम गायकवाड, अजय सुरेश कुंभार, मनोज महादेव गायकवाड हे सर्वजण मिळून दि.14 मार्च रोजी 11.15 वा.सु. विजबिल वसुली करण्यासाठी सलगरा येथे विजबिल वसुलीचे काम करत होते. दरम्यान प्रल्हाद बाजीराव लोमटे या ग्राहकाचे विज बिल विचारणेसाठी त्यांचे घरासमोर गेले असता त्यांचे शेजारी राहणारे नितीन आनंदराव लोमटे यांनी तेथे येऊन थकबाकीच्या वादातुन महावितरण पथकातील वरिष्ठ तत्रंज्ञ - वाल्मीक कांबळे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन लोकसेवकाच्या कर्तव्यात जाणीव पुर्वक प्रतिबंध केला. अशा मजकुराच्या वाल्मीक कांबळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 353, 323, 504, 506 अंतर्गत नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

No comments:

Post a Comment