रंगपंचमी साहित्य खरेदीत ग्राहकांचा निरुत्साह

 


उस्मानाबाद - जिल्ह्यात सर्वत्र रंगपंचमी ही उत्साहात साजरी केली जाते.लागोपाठ दोन वर्ष या सणावर कोरोनाचे सावट आले होते प्रशासनाने रंगपंचमी साजरी करणाऱ्यांवर अनेक निर्बंध घातले होते. मात्र यावर्षी काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

दोन दिवसांवर आलेल्या रंगपंचमी सणाचा उत्साह आता सगळीकडे दिसायला लागला आहे होळीचा सण आणि त्यानंतर पाच दिवसांनी येणारी रंगपंचमी साजरी करण्यासाठी उस्मानाबाद शहरवासीयांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे 

शहरातील बाजारपेठेत रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध रंगीबेरंगी रंग बाजारात उपलब्ध झाले आहेत शहरातील बाजारपेठेत पिचकाऱ्या, बंदूका, विविध रंग खरेदीसाठी करण्यासाठी नागरिक येत आहेत बाजारपेठेतील विक्रेते म्हणत आहेत की रंगपंचमीच्या खरेदीसाठी नागरिकांची प्रतिसाद अल्प प्रमाणात आहे म्हणेल तेवढी गर्दी झाली नाही मात्र पूर्वी पाच ते सहा दिवसांपासून रंगपंचमीच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे आता मात्र रंगपंचमीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी पाठ फिरवली आहे

No comments:

Post a Comment