आम आदमी पक्षाची मागणी
उस्मानाबाद -
आम आदमी पार्टीच्या वतीने बारा हजार एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण करून दुखवट्यातील संपूर्ण पगार देऊन निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे या मागणीचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्राची वाहिनी लालपरी म्हणजे एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर असे एकूण 92 हजार कर्मचाऱ्यांचे मागील पाच ते सहा महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन चालू आहे. महाराष्ट्रातील एकूण 59 महामंडळा यापैकी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा अतिशय अल्प वेतन मध्ये काम करावे लागत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवन जगणे सुद्धा कठीण झाले आहे. या कारणास्तव त्यांना समान हक्क मिळण्याच्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळाचे विलीनीकरण करणे शासनाने गरजेचे आहे परंतु आपले परिवहन मंत्री यांनी सदरील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याच्या हेतूने नवीन कर्मचारी सेवा वर्षे एक ते दहा यांना पाच हजार रुपये दहा ते वीस सेवेत असलेले लोकांना चार हजार रुपये व वीस वर्षाच्या सेवे पुढील लोकांना अडीच हजार रुपये वेतन वाढ
केले आहे तुटपुंजी वेतन वाढ करून परिवहन मंत्रांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेले आहे व वेतनातील फरक बघितला तर ज्येष्ठांना कमी वेतन वाढ देऊन त्यांची अवहेलना केली आहे तोडफोडीचे धोरण अवलंबून एक प्रकारचे आंदोलन चिगळण्याचा प्रयत्न परिवहन मंत्र्यांनी केलेला आहे तरी इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांना लाख रुपये पगार व एसटी कर्मचाऱ्यांना 22 ते 25 हजार लोकशाहीमध्ये अन्यायकारक असून मागील पाच महिन्याच्या आंदोलनामध्ये 60 हजार कर्मचारी घरी बसून आहेत वरील कर्मचारी गरीब असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीरपणे निलंबन करण्यात आले आहे त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे व 118 कर्मचारी हे मयत झाले असून त्यापैकी अनेकांनी आत्महत्या केलेले आहे सदरच्या आत्महत्या होण्यास महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे तरीपण आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्याला मान्यता म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचे वर्गीकरण करावे व दुखवट्यातील त्यांचा संपूर्ण पगार तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांना द्यावा व निलंबनाच्या केलेल्या कार्यवाही तात्काळ परत घ्यावा. असे मागण्या निवेदनात आहेत या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अजित खोत, मुन्ना शेख, कमलाकर ठवरे, तानाजी पिंपळे, शहाजी पवार, आकाश कांबळे, उस्मान तांबोळी, माया जाधव, नामदेव वाघमारे, प्रेम कुमार वाघमारे, करण शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.