दैनिक जनमत : वारकरी अपघातातील मयतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळणार २ लाख रुपये

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Monday, March 28, 2022

वारकरी अपघातातील मयतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळणार २ लाख रुपये

 आ. कैलास पाटील यांचा पाठपुरावा



उस्मानाबाद -

कदमवाडी ता.तुळजापुर येथील वारकरी हे पंढरपुर येथे ट्रॅक्टरने प्रवास करुन दर्शनासाठी जात होते. वाटेत जाताना त्यांच्या वाहनाचा अपघात होऊन चार वारकऱ्यांचा मृत्यु झाला होता त्या चार मयतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपये असे चार जणांचे एकूण ८ लाख रुपये मदत मिळणार आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री सचिवालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.

अहवालातील यादीनुसार मृत व्यक्तींच्या कायदेशीर वारसांस आवश्यक ती संपूर्ण पडताळणी करुन मंजूर अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे. तसेच या घटनेतील मृत व्यक्तींचे प्रकरणी पोलीस पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्ट, मृत्यु प्रमाणपत्र व इत्यादी कागदपत्र अहवालासह सादर करण्यात यावीत. त्याच प्रमाणे अर्थसहाय्य मंजूर प्रयोजनाकरीता वापरण्यात आल्याबद्दल विनियोगाचे प्रमाणपत्र देखील सादर करावे व अर्थसहाय्य प्राप्त झाल्याबद्दल महसुल मुद्रांकित पावती या सचिवालयास सत्वर पाठवावी. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.



जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मिळाली ३ कोटींची थकहमी

  धाराशिव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. उस्मानाबाद, नांदेड व मुंबई या बँकांनी सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासना...