शुल्क न भरल्याने 15 पेक्षा जास्त विध्यार्थ्यांना ठेवले परिक्षेपासून वंचितशांती इंग्लिश स्कुल चा धक्कादायक प्रकार

सोलापूर:न्यू
 संतोष नगर परिसरात असलेल्या शांती इंग्लिश मिडीयम स्कुल च्या मुख्याध्यापिका यांनी कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क न भरल्यामुळे आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर ठेवून परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार करत आहेत. हा प्रकार अत्यंत निंदनीय व गंभीर असून सदर शाळेवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे याकरिता आम आदमी पालक युनियन तर्फे व इतर पालकांतर्फे प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली.
कोरोनाच्या काळात सर्वच शाळा बंद होत्या अशातच विद्यार्थी सुद्धा दोन वर्ष शाळेत गेलेली नव्हती. परंतु खाजगी शिक्षण संस्थेतील शाळांनी ऑनलाईनच्या नावाने पैसे वसूल करण्याचे काम पालकांकडून केले. काही पालक वर्गांची कोरोनाच्या काळात अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. त्यामुळे शैक्षणिक शुल्क भरणे पालकांना कठीण झाले होते.अशातच आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या एप्रिल महिन्यात परीक्षा सुरू झाल्या आहेत. परंतु आजपर्यंतचे कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क भरणार नाही तेव्हापर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिल्या जाणार नाही म्हणून शाळेतील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देता वर्गाबाहेर ठेवले.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम होत असून विद्यार्थी आपल्या पालकांसमोर आम्हाला वेगळे बसविले जात असल्याचे डोळ्यातून अश्रू काढून सांगत आहेत.
घडल्या घटनेची माहिती मिळताच शहरातील आम आदमी पालक युनियन चे अध्यक्ष रॉबर्ट गौडर हानी शाळेला भेट देऊन पालकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.या संबंधी त्यांनी शाळेच्या मुख्यध्यापिकांना भेटण्याचा प्रयत्न केला असता शाळेच्या प्रशासनाने भेट होऊ दिली नाही.
त्यामुळे त्यांनी थेट प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांना  या घडल्या प्रकारची माहिती दिली.
त्यानंतर किरण लोहार यांनी सदर तक्रार पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जावीर यांच्या कडे वर्ग केली आहे.
एककीकडे शिक्षण विभाग व शिक्षण मंत्री फी न भरल्या कारणाने कोणत्याही विध्यार्थ्यांना परिक्षेपासून आणि शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देत असतात तर दुसरीकडे मात्र मुजोर शाळा व व्यवस्थापक कडून विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित ठेवले जात आहे.घडल्या प्रकारावर शिक्षण विभागाकडून कोणती कारवाई होते तर पहावे लागेल.
No comments:

Post a Comment