गाळपाच्या प्रतीक्षेत असलेले फड सापडताहेत आगीच्या भक्ष्यस्थानीपारा येथे दीड एकर ऊस महावितरणच्या तुटलेल्या जम्परिंग मुळे जळून खाक

 पारा (राहुल शेळके ): एकीकडे चौदा पंधरा महिने उलटूनही कारखान्याची तोड मिळत नसल्याने फडातच चिपाड होत असलेल्या उसाची चित्तर कथा वाशी तालुक्यातील पारा येथे दिसून येत असताना दुसरीकडे गाळपाच्या प्रतीक्षेत असलेले उस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहेत

          वाशी तालुक्यातील अनेक गावात ऊस गाळपाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यास्थितीत उन्हाचा तडाखा वाढत आहे. शुष्कता वाढत आहे. यामुळे फडातच असलेल्या अनेकांचे ऊस उसावरून जाणाऱ्या महावितरणच्या तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत भस्मसात होत आहे. मंगळवारी(दि.29) दुपारी पारा येथे शॉर्टसर्किटने आग लागून भराटे यांचा साडेचार एकर ऊस जळून खाक झाला होता. ही घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी पारा येथील सर्वे नंबर 335 /अ मधील रामा दगडू वैद्य या शेतकऱ्याच्या शेतातून जाणाऱ्या पिंपळवाडी गावठाण लाईटच्या लोखंडी पोलवरील जम्परिंग तुटून लागलेल्या आगीत   दीड एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या घटनेचा तलाठी साबळे यांनी पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. या घटनेमुळे हा शेतकरी पूर्णपणे संपला असून लवकरात लवकर कारखान्याने हा उस न्यावा अशी विनवणी कारखाना कर्मचाऱ्यांना करताना दिसून आला. तसेच महावितरण ने या शेतकऱ्यास झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वाशी उपविभाग यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment