दैनिक जनमत : जिल्हा परिषद लघु पाटबंधारे कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अनेक दिवसापासुन गायब?

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Saturday, April 23, 2022

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अनेक दिवसापासुन गायब?

पाझर तलाव दुरुस्तीच्या कामावर अभियांत्यांची देखरेख नसल्यामुळे कामाचा दर्जा खालावला 

अभियंता गायब बिले कोण रेकॉर्ड करणार ठेकेदारांचा टाहो


पाझर तलाव दुरुस्तीचे काम निकृष्ठ दर्जाचे केले जात असल्याची मलकापुर च्या सरपंचा सह ग्रामस्थांची तक्रार


परंडा (भजनदास गुडे ) - जिल्हा परिषद लघूपाटबंधारे उप विभाग परंडा कार्यालया मार्फत पाझर तलाव दुरुस्ती,कोल्हापुरी बंधारे दुरूस्तीची कामे करण्यात येत असुन कनिष्ठ अभियंता हनुवते गेल्या अनेक दिवसा पासुन गायब असल्यामुळे मलकापुर येथिल पाझर तलावाचे काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असल्याची तक्रार सरपंचा सह ग्रामस्थांच्यां वतीने निवेदना द्वारे करण्यात आली आहे.

      दि २२ एप्रील रोजी जिल्हा परिषद लघू पाटबंधारे उप विभाग  कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परंडा तालुक्यातील मलकापुर येथिल पाझर तलाव क्र ३च्या दुरुस्तीचे काम करन्यात येत असुन कामावर अभियंता फिरकलेच नसल्याने ठेकेदारा कडून निकृष्ठ दर्जाचे काम करण्यात येत आहे .

     भरावाचे खोदकाम अरूंद व कमी खोलीचे करून निकृष्ठ दर्जाची काळी माती भरण्यात येत आहे.तसेच दबाई साठी रोलींग व पाणी मारण्यात येत नाही .

   या प्रकरणी सबंधीत आधिकारी यांनी दखल घेऊन केलेल्या  कामाची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी करन्यात आली आहे.

या प्रकरणी जलसंधारण आधिकारी जोशी यांच्याशी संपर्क साधला असता अंदाजपत्रका नुसार काम करण्यच्या सुचना ठेकेदार यांना पुर्वीच दिलेल्या असून,कनिष्ठ अभियंता हनुवते विना परवाना गैरहजर असल्याची माहिती वरिष्ठ आधिकारी यांना .देण्यात आली असून सदरील कामाची पाहणी करण्यात येईल असे सांगीतले.


या कार्यालया अतंर्गत नवीन कोल्हापूरी बंधाऱ्यांची व पाझर तलाव दुरूस्तीची करोडो रुपयांची कामे सुरु आहेत. यातील काही कामे अंतीम टप्यात आहेत मात्र या कामाची साईट पाहाणारे कनिष्ठ अभियंता मागील काही दिवसापासुन गायब असल्यामुळे या कमाची साईट कोण पाहाणार व अंतीम टप्यात असलेल्या कामाचे बीले कोण रेकॉर्ड करणार असा प्रश्न समंधीत ठेकेदाराना सतावत आहे.

       मलकापुर सरपंच व ग्रामस्थ यांच्या तक्रारी वर अधिकारी काय कारवाई करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे .

    निवेदनावर मलकापुर च्या सरपंच सुक्षाला कुतवळ,लक्ष्मण खोसे पाटील,मारूती हिवरे, बाबुराव हिवरे,अर्जुन जरे,महादेव तेरकर, लक्ष्मण वरपे,गोपाळ खोसे भालचंद्र हिवरे,तुकाराम तेरकर, दत्ता ढवळे, प्रविण भोगील,ओंकार खोसे, संदिप हिवरे,कृष्णा चौगुले, रंगराव खोसे, दिगंबर भोसले,मारूती चव्हाण, महादेव चव्हाण,पांडूरंग तेरकर, भाऊराव बिडवे,रामदेव तेरकर आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.