दैनिक जनमत : नुकसानग्रस्त भागाची खा. ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पाहणी

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Tuesday, April 12, 2022

नुकसानग्रस्त भागाची खा. ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पाहणी


सलगरा,दि.१२ (प्रतिनिधी) - 

तुळजापूर तालुक्यातील गंधोरा - किलज येथे दि.१० एप्रिल रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणी दौर्‍यासाठी दि.११ एप्रिल रोजी तालुक्यातील सर्व महसूल, कृषी आणि महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह खासदार ओमराजे निंबाळकर हे आले होते. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त प्रत्येकाला मदत मिळण्याच्या अनुषंगाने पंचनामे करणेबाबत संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.


त्यामुळे ह्या सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना, शेतकऱ्यांना आणि जनावरे मृत्युमुखी पडलेल्या पशुधन मालकांना पूर्वपदावर येण्यासाठी तत्काळ मदत मिळण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार, महावितरण विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी आदींनी नुकसानग्रस्त भागात स्वतः जाऊन नुकसान झालेला एकही व्यक्ती मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवून पंचनामे करावेत आणि तात्काळ मदत मिळण्यासाठी शासनाकडे अहवाल सादर करावा अशा सूचना या वेळी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यासोबतच महावितरणच्या अधिकार्‍यांनी अवकाळी वाऱ्यामध्ये पडझड झालेले पोल आणि त्यामुळे विस्कळीत झालेली विद्युत व्यवस्था तात्काळ दुरुस्त करून अवकाळी वाऱ्यांचा प्रभाव असलेल्या संपूर्ण भागांमध्ये वीज व्यवस्था पूर्वपदावर सुरळीत करावी अशा सूचना दिल्या. या वेळी तहसीलदार, महसूल, कृषी, महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह ग्रामसेवक, सरपंच तलाठी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मिळाली ३ कोटींची थकहमी

  धाराशिव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. उस्मानाबाद, नांदेड व मुंबई या बँकांनी सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासना...