दैनिक जनमत : मेंढपाळाचा मुलगा बनला कृषीअधिकारी

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Wednesday, April 6, 2022

मेंढपाळाचा मुलगा बनला कृषीअधिकारी

 


कारी गावच्या तरुणाची यशोगाथा

कारी ( आसिफ मुलाणी)

आई-वडिलांनी मागील ६० वर्षापासून मेंढपाळाचा व्यवसाय करून कुटुंबाचा गाडा चालवला. तीन मुलांचे शिक्षण कसेबसे पूर्ण करून लहान मुलाला कृषी अधिकारी बनविण्याचा पराक्रम उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील मेंढपाळ अंकुश करडे यांच्या कुटुंबांनी करून दाखवला आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील राहणारे करडे यांच्या कुटुंबाची ही यशोगाथा.कुटुंबात दोन मुले, दोन सूना, नातवंडे, पत्नी आणि अंकुश  करडे असे ०८जण. करडे यांनी मेंढपाळाचा व्यवसाय करून आपल्या मुलांचे शिक्षण केले.मुलगा नितीन करडे यांनी पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत तर प्रमिला माणिकराव देशमुख विद्यालयात दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करत, राहुरी कृषी विद्यापीठातून एम एस सी ऍग्री ही पदवी मिळवली. डिसेंबर २०२१ मध्ये आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल ०१ एप्रिल २०२२  लागला.यातून नितीन करडे यांची सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कृषी अधिकारी पदी निवड झाली. निवडीबद्दल करडे यांचे  कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

माझ्या आई वडिलांनी केलेल्या कष्टाची जाण ठेवून मी अभ्यास केला परीक्षा दिली. उत्तीर्ण झालेल्या परीक्षेसाठी आई -वडील शिक्षकांची मोलाची साथ मिळाली. त्यामुळे हे सर्व शक्य झाले. असे नितीन करडे यांनी सांगितले.

कष्टातून मिळालेल्या पैशातून मुलाला शिकवलेल्या कामाचं आज सार्थक झालं. याचा इतका आनंद झाला की तो सांगता येत नाही. अशी प्रतिक्रिया आई  छायाबाई करडे  यांनी दिली.