दैनिक जनमत : उस्मानाबादेत रांगोळीतून साकारली प्रभू रामचंद्रांची प्रतिकृती

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Sunday, April 10, 2022

उस्मानाबादेत रांगोळीतून साकारली प्रभू रामचंद्रांची प्रतिकृतीउस्मानाबाद - श्रीराम जन्मोत्सव, रामनवमीचे औचित्य साधत उस्मानाबाद समर्थनगर येथील श्रीराम  मंदिर येथे रामराज्य प्रतिष्ठान उस्मानाबाद आणि कलायोगी आर्ट्स क्लास उस्मानाबाद च्या टीम कडून रामनवमीच्या शुभेच्छा पर रांगोळी साकरण्यात आली आहे, या रांगोळीचा आकार 5 फुट × 8 फुट = 40 चौरस फुट इतका असून ही रांगोळी 15 किलो रंगीत रांगोळी चा वापर करत साकारण्यात आली आहे. या रांगोळी साठी पाच तासांचा कालावधी लागला आहे ही रांगोळी कलायोगी आर्ट्स क्लास  चे राजकुमार कुंभार सर यांच्या मार्गदर्शनात त्यांचे विद्यार्थी जय पंडित आणि समृद्धी कुलकर्णी यांच्या सहकार्याने पूर्णत्वास आली आहे , या रांगोळी मध्ये समुद्रात एक हाती धनुष्य एक हाती बाण घेऊन लंकेच्या रोखाने पहात उभे असलेले श्री रामचंद्र भगवान यांची ची रांगोळीतील प्रतिकृती अगदी हुबेहूब आणि मोहक साकारल्याने भाविक भक्तांचे आकर्षण बनली आहे रांगोळी पाहण्यासाठी भावी भक्तांची गर्दी होत आहे.