श्री सिध्दीविनायक परिवाराचा स्नेहमेळावा संपन्नउस्मानाबाद

            दिनांक ०१ मे (महाराष्ट्र दिन) २०२२ रोजी उस्मानाबाद शहरातील परिमल मंगल कार्यालय येथे श्री सिध्दीविनायक परिवाराचा प्रथम स्नेहमेळावा आनंदात व उत्साहात संपन्न झाला.
            श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून श्री सिध्दीविनायक परिवाराच्या स्थापने पासून ते आजपर्यंत श्री सिध्दीविनायक परिवाराशी जोडले गेलेले सदस्य व कर्मचारी यांचा सहपरिवार स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. सदरील कार्यक्रमात दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर संस्थापक श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी श्री सिध्दीविनायक परिवारातील सर्व उद्योग यामधील कार्यरत आजी व माजी कर्मचारी यांच्या कुटुंबियांसमवेत संवाद साधला व कार्यरत कर्मचाऱ्यांच्या परिवारातील सदस्यांनीही श्री सिध्दीविनायक परीवाराबद्द्ल आपले मनोगत व्यक्त केले. श्री सिध्दीविनायक परिवार इ.स.२००२ सालापासून समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून कार्यरत आहे.
            श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि., श्री सिध्दीविनायक डिस्ट्रीक्ट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि., उद्योग साधना फाउंडेशन, समृद्धी गारमेंट्स, श्री सिध्दीविनायक सोसायटी माती परीक्षण प्रयोगशाळा व शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारा श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक हा गुळ पावडर कारखाना, समृद्धी पेट्रोलियम, ॲग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या माध्यमातून श्री सिध्दीविनायक परिवार जिल्ह्यातील सर्व ग्राहकांच्या व सभासदांच्या सेवेमध्ये कार्यरत आहे.
            श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामध्ये परिवाराच्या मागील वीस वर्षांच्या वाटचालीचा आलेख मांडला. सिध्दीविनायक परिवाराचे सदस्य ॲड.प्रतिक देवळे यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन परिवाराचे सदस्य व जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.नितीन भोसले यांनी मानले. यावेळी यशदा मल्टीस्टेट चे अध्यक्ष श्री.सुधीर सस्ते व सी.ए.श्री.प्रवीण प्रजापती उपस्थित होते.

No comments:

Post a Comment