स्वाधार योजेनेची अट शिथिल करण्याची विद्यार्थी संघटनेची मागणी

  


उस्मानाबाद - स्वाधार योजेनेची अट शिथिल करा या मागणीचे निवेदन विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकार तर्फे राबवली जाणारी स्वाधार योजना ही फक्त शहरी भागातील महाविद्यालयास लागू करण्यात आली आहे. परंतु अशी अनेक महाविद्यालये आहेत जी शहराजवळ आहेत परंतु शहरी भागात मोडत नाहीत. वास्तविक तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची खर्च शहरी भागातील महाविद्यालयासारखाच होतो. या बाबींचा विचार करून सर्वांना लाभ मिळावा व गरजू विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी अट शिथिल करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post