पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर


अध्यक्षपदी लिंबराज डुकरे तर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा होणार अहिल्या जन्मोत्सव 
उस्मानाबाद - पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समिती उस्मानाबाद कडून दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम घेवून अहिल्यादेवी जयंती साजरी होत असते. याही वर्षी अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. काल जत्रा फंक्शन हाॅल मध्ये नुतन कार्यकारिणी निवड व जयंतीनिमित्त घ्यावयाचे विविध कार्यक्रम याबाबत नियोजन बैठक घेण्यात आली. यामध्ये नुतन कार्यकारिणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. 
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती 2022 चे नुतन अध्यक्षपदी लिंबराज डुकरे, कार्याध्यक्षपदी सुरेश शिंदे, उपाध्यक्षपदी रवि देवकते, सचिवपदी प्रसाद तेरकर, कोषाध्यक्ष समाधान पडुळकर यांची निवड करण्यात आली. तसेच सहकार्याध्यक्ष सचिन चौरे, सहउपाध्यक्ष बाबासाहेब वाघुलकर, सहसचिव ओम एडके, सहकोषाध्यक्ष सागर कोळेकर, प्रसिध्दी प्रमुख सागर दाणे, सह प्रसिध्दी प्रमुख शिवम देवकते, विधी सल्लागार अॅड.किरण चादरे, प्रवक्ता निखील घोडके, सोशल मेडिया प्रमुख गोपाळ देवकते, संघटक आकाश कानडे, नितीन सातपुते, बाबासाहेब चादरे, दादा घोडके, समाधान काकडे, आकाश सलगर, शुभम शेंडगे, दशरथ चौरे, काका तिघाडे, आकाश हाराळे यांचीही निवड करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमात नुतन कार्यकारिणीस मा.नगराध्यक्ष दत्ता बंडगर, मा.जि.प.सदस्य भारत डोलारे, अॅड.खंडेराव चौरे, समितीचे मावळते अध्यक्ष डाॅ.संजय सोनटक्के, डाॅ.संतोष पाटील यांनी मार्गदर्शन केले आणि अहिल्या जन्मोत्सवाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सचिन शेंडगे, इंद्रजित देवकते, बालाजी शेंडगे, नरसिंग मेटकरी, राहुल काकडे, श्रीकांत तेरकर, गणेश एडके, अशोक गाडेकर, गणेश सोनटक्के, नवनाथ काकडे, नितिन डुकरे, संदीप वाघमोडे, देवा काकडे, नागेश वाघे, बालाजी वगरे, दत्ता दाणे, मारुती काकडे, नवनाथ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मनोज डोलारे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी समितीच्या मागील जयंतीनिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा आढावा उपस्थितांना सांगितला. यावर्षीही अहिल्यादेवी जयंतीनिमित्त समितीमार्फत मोफत सर्व रोगनिदान शिबीर, रक्तदान शिबीर, व्याख्यानमाला, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कर्तृत्वसंपन्न महिलांचा सन्मान सोहळा , अहिल्यादेवी होळकर चौकाचे सुशोभीकरण, मोफत हाडांची ठिसुळता तपासणी शिबीर, गरजूंना महिलांना शिलाई मशीन/शेळी वाटप, भव्य पारंपरिक मिरवणूक असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचेही प्रा.डोलारे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोमनाथ लांडगे यांनी केले. अहिल्यादेवींचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत नेण्यासाठी समितीच्या नुतन कार्यकारिणीस समांतर माजी सैनिक कमिटी, वैद्यकीय कमिटी, अभियांत्रिकी कमिटी, शिक्षक कमिटी, वकील कमिटी, वीज कर्मचारी कमिटी, विद्यार्थी युवक कमिटी, रिक्षाचालक कमिटी, व्यावसायिक व नोकरदार वर्ग कमिटी अशा अनेक कमिटी स्थापन करण्यात येणार आहेत.अशी माहिती समितीचे प्रा.लांडगे यांनी दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रा.बालाजी काकडे यांनी मानले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment