आव्हानाला प्रतीआव्हान ! कमिशनखोर लोकप्रतिनिधींची पत्रकार परिषद म्हणत मल्हार पाटील यांनी घेतला समाचार
व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्याचे प्रतीआव्हान


उस्मानाबाद - पिकविम्याच्या विषयावरून जिल्ह्यात राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेने पत्रकार परिषद घेत आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांचे पुत्र भाजप चे युवा नेते मल्हार पाटील आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या नेत्यांना कमिशनखोर लोकप्रतिनिधी म्हणत जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे.

मल्हार पाटील व्हिडिओ मध्ये म्हणतात, पीक विम्याच्या यशाचे श्रेय शेतकरी हे आमदार राणा दादा यांना देत असल्याने विरोधकांना पोटदुखी होत आहे. हिम्मत असले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक लावा त्या बैठकीत तुम्हाला आमदार राणा दादा हे मुद्देसूद सडेतोड उत्तर देतील मात्र लढणाऱ्या नेत्याला बदनाम करू नका असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्याच्या दरबारात बैठक घेण्याचे प्रतीआव्हान शिवसेनेच्या नेत्यांना केले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे बुडल्यात जमा होते मात्र आमदार राणादादा यांनी कायदेशीर लढा दिल्यानंतर हे पैसे 6 आठवड्यात देण्याचे आदेश उच्च न्यायलायाने दिले आहेत. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात हा निकाल असून त्यासाठी आमदार राणा यांनी प्रयत्न केले. पीक विम्याचे श्रेय हे आमदार राणा यांना मिळत असल्याने विरोधकांना पोटदुखी होत आहे.

आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना खुले आव्हान देण्याची लायकी विरोधकात नाही, आमदार राणा यांना खुले आव्हान देणारा अजून जन्माला आला नाही. जर विरोधकात हिम्मत असेल तर त्यांनी पीक विमा या विषयावर केव्हाही मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांच्याकडे बैठक लावावी त्यात आमदार पाटील हे शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांना व त्यांच्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तर देतील. मंजूर पीक विम्याचे प्रकरणी शेतकरी, कार्यकर्ते यांनी मनापासून आमदार राणा यांचे आभार मानले आहेत.

 आमदार राणा दादा यांच्या सोबत बैठक लावण्याची विरोधकांची लायकी नाही, मुख्यमंत्री कृषिमंत्री यांच्या सोबत कधीही बैठक लावा त्याला सडेतोड उत्तर राणा देतील असे प्रतीआव्हान मल्हार पाटील यांनी केले आहे.Post a Comment

Previous Post Next Post