मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारुन खडकी येथे निषेध

 


तुळजापूर तालुक्यातील खडकी येथे सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

राजे मल्हारराव होळकर यांच्या बद्दल पाठीमागच्या काळामध्ये ही जितेंद्र आव्हाड यांनी अपशब्द वापरले होते. आताही राजे मल्हारराव होळकर व छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरुन महाराष्ट्रातील व भारत देशातील तमाम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.वारंवार महापुरुषांबद्दल अपशब्द वापरून महापुरुषांचा अपमान करण्यात येत आहे.राजे मल्हारराव होळकर यांनी संपुर्ण भारतात सह इराण इराक पर्यंत अटक भारताचा झेंडा लावला आहे. भारत भुमी साठी राजे मल्हारराव होळकर व छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांचे खुप मोठे योगदान आहे. हे योगदान येथील राजकीय मंडळी जर विसरणार असतील अन् बेताल वक्तव्य करणार असतील तर महाराष्ट्रातील व देशातील जनता तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली,तरी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी व आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उपस्थिती धनगर समाज बांधवांनी केली आहे.

यावेळी उपस्थित संतप्त धनगर समाज बांधवांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी राम जवान, म्हाळाप्पा सुरवसे, भरत जवान, विठ्ठल भंडारे, ज्ञानेश्वर जवान, विद्याधर सोनवणे, सिद्धाराम सुरवसे, संजय आडसुळ, उमेश जवान, सचीन भंडारे, संतोष गायकवाड, सतीश कांबळे, महादेव सुरवसे, विकास साबळे, संतोष कांबळे यांच्या सह समाज बांधव व खडकी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment