जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 20 जूनला बैठक

 


         उस्मानाबाद,दि.8(प्रतिनिधी) जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची एप्रिल 2022 ते जून 2022 कालावधीमधील त्रैमासिक बैठक दि. 20 जून 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे.

जनतेच्या तक्रारी किंवा अभिकथने पुराव्यासह सादर करावयाची असल्यास तक्रारी किंवा अभिकथने संबंधित अधिकारी ज्या तालुक्यात कार्यरत आहे, त्या तालुक्यातील भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे किंवा संबंधित विभागाच्या जिल्हा दक्षता समितीकडे पाठवावीत. संबंधित विभागाने किंवा तालुकास्तरीय समितीने कार्यवाही केली नसल्यास जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलण समितीकडे तक्रार सादर करता येईल. तरी याबाबत सर्व कार्यालय प्रमुख, अशासकीय सदस्य आणि सर्व जनतेने याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment