जप्त केलेली वाळू व क्रश सॅंडचा 9 जून रोजी लिलाव इच्छुकांनी सहभागी होण्याचे तहसीलदारांचे आवाहन

 

        उस्मानाबद:दि03(प्रतिनिधी):- येथील सांजा रोड परिसरातील हिरल हॉस्पीटल समोर जप्त करण्यात आलेली 29 ब्रास वाळू आणि  96 ब्रास क्रश सँडचा लिलाव उस्मानाबाद तहसील कार्यालय परिसर येथे दि. 9 जून 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित केला आहे. या लिलाव प्रक्रियेत इच्छुकांनी सहभागी व्हावे ,असे आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे. या लिलावामध्ये एक ब्रास वाळू 600 रुपये प्रती ब्रास या दराने 75000 रुपये (अक्षरी पंच्याहत्तर हजार रुपये मात्र) एवढी हातची किंमत धरुन उक्त ठिकाणी जाहीर लिलावाव्दारे विक्री करणे आहे. तसेच या लिलावाच्या सर्वोच्च बोलीच्या रक्कमेवर 10 टक्के अतिरिक्त रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी म्हणून लिलावधारकाकडून शासनजमा करणे बंधनकारक राहील.

        याबाबत कोणत्याही प्रकारचा हितसंबंध हक्क असणाऱ्या व्यक्तीचा सदरच्या लिलावास काही आक्षेप,उजर किंवा तक्रार इत्यादी असल्यास बात्मी प्रसिध्द झाल्यापासून दिनांक 6 जून 2022 पूर्वी लेखी स्वरुपात या कार्यालयास कागदोपत्री पुराव्यासह सादर करावा.विहीत मुदतीत कुणाचा आक्षेप , उजर किंवा तक्रार प्राप्त न झाल्यास या लिलावास कुणाचाही आक्षेप नाही असे समजण्यात येऊन नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच विहीत मुदतीनंतर आलेले आक्षेप ,उजर किंवा तक्रार विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तरी ईच्छुकानी उक्त लिलावामध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन श्री .माळी यांनी केले आहे.            

                                         

No comments:

Post a Comment