मोदी सरकारच्या यशस्वी विकासात्मक कामाची अष्ट वर्षपुर्तीच्या औचित्याने बाईक रॅलीचा झंजावात

 
उस्मानाबाद -


 पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारने यशस्वी विकासात्म कामाचे ८ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी विकास तीर्थ बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चा करीत आहे.  आमदार राणाजगजितसिंह पाटील व आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी तालुका विकास तीर्थ रॅलीचे नियोजन युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रविण घुले यांनी केले. वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथून विकास तीर्थ बाईक रॅलीची सुरवात करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन धाराशिव जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा चे  जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर व भाजप उपनगराध्यक्ष वाशी सुरेश कवडे यांच्या हस्ते करण्यात आले व या बाईक रॅलीची वाशी तालुक्यातील जवळपास तीन (०३) जिल्हा परिषद गट आणि सहा (०६) पंचायत समिती गणामधील प्रत्येक गावा-गावातुन सुमारे ७५ कि.मी. प्रवास करत कडकनाथवाडी येथे सांगता करण्यात आली. 

या रॅलीच्या अनुषंगाने मागील ८ वर्षात झालेल्या विविध राष्ट्र बळकटीकरणाच्या, सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोणातून शेतकरी, लघु उद्योजक महिला, युवती सक्षमीकरणाच्या, व युवा उद्योजक मजबुतीकरणाच्या, आत्मनिर्भर भारत अंतर्गत असंख्य योजना आणि निर्णयांचा गावा गावातील सर्व सामान्य जनते समोर यावेळी माहिती देण्यात आली.

याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुलदीप भोसले, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष महादेव लोकरे, भाजपा तालुका सरचिटणीस राजगुरू कुकडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष सुधीर घोलप, प्रसाद मुंडे, आदेश घुले, गणेश कवडे, बापू दिलीप पाटील, अमीत ढालगडे, शहाजी तोरडमल, विशाल उघडे, किशोर तोरडमल, संजय नेमाने, सुजित लोकरे, धनराज नवले, सुहास चौगुले,संतोष गादेकर, स्वप्निल ‍शिलवंत, हनुमंत खोत, नानासाहेब खोत, सुजीत होळे, स्वप्निल  उमरदंड, वैभव भोसले, युवराज पाटील, महेंद्र उंधरे, रविंद्र लोकरे व तालुक्यातील भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या रैली मध्ये सहभाग घेतला तसेच वाशी तालुक्यातील विविध ठिकाणी ,गावा गावात या बाईक रैलीचे फटाके फोडून ,पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


No comments:

Post a Comment