उस्मानाबाद शहरातील भीमनगर, बौद्धनगर, अजिंठानगर, खडकपुरा व चव्हाण गल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाला मोठा प्रतिसाद

 उस्मानाबाद -
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभरात सुरु असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला उस्मानाबाद शहरातही ठिकठिकाणी  प्रारंभ झालेला आहे. शहरातील भीमनगर, बौद्धनगर, अजिंठानगर, खडकपुरा व चव्हाण गल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला महिला, पुरुष व युवकांमधून मोठा प्रतिसाद मिळाला.

सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ  राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र धुरगुडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आयाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष वाजीद पठाण, अल्पसंख्यांक विभागाचे असद पठाण, अन्वर शेख व अभियानाचे संयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संघर्ष बनसोडे, लहू बनसोडे, अविनाश शिंगाडे, सागर चव्हाण, सिद्धार्थ सोनवणे, बापू साबळे, यशवंत शिंगाडे, सुगत सोनवणे, अमित बनसोडे, महिला विभागाच्या कमल चव्हाण, पल्लवी बनसोडे, अर्चना शिंगाडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांचे हात  अधिक बळकट करण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला भीमनगर, बौद्धनगर, अजिंठानगर, खडकपुरा व चव्हाण गल्ली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment