तेरणा साखर कारखान्याची न्यायालयीन लढाई भैरवनाथ शुगरने जिंकली

 परंडा येथे फटाके फोडुन शिवसैनिकांनी केला जल्लोष

परंडा ( दि. १८ जून)

तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर घेण्याची न्यायालयीन लढाई आ. तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ साखर समूहाने जिंकली आहे.डीआरटी कोर्टाने (कर्ज वसुली न्यायाधिकरण) ने तेरणा कारखानाबाबत ट्वेंटीवन शुगरची याचिका फेटाळली असून उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राबविलेली निविदा प्रक्रिया कायदेशीर ठरवत भैरवनाथ उद्योग समूहाला दिलेले टेंडर योग्य असल्याचा निकाल दिलयाने परंडा येथे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यानी दि.१८ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडुन जल्लोष केला.

      यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव, आणिल देशमुख,दत्ता रणभोर, सतीश दैन,गुलाब शिंदे,पोपट चोबे, शम मोरे,सतीष मेहेर, नवनाथ बुरंगे,उमेश परदेशी,शाहू खैरे,कुणाल जाधव,रमेश गरड, शुक्राचार्य ठोरे,तानाजी कोलते, पिंटु सांगडे,आप्पा बकाल, दिगंबर गुडे,विष्णु गुडे,विनोद जगताप,बापु डबडे,अमोल जगताप, बाळासाहेब चतूर, मिलींद लिमकर,विकास देवकते, धर्मा जगदाळे आदी उपस्थित होते.

           या निकालामुळे भैरवनाथ समूहाला तेरणा कारखान्याचा ताबा देणे शक्य होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने २५ नोव्हेंबर २०२१ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव घेत आगामी २५ वर्षासाठी तेरणा कारखाना भैरवनाथ समूहाला

भाडेतत्वावर दिला आहे.उच्च न्यायालय नंतर डीआरटी कोर्टात त्यानंतर पुन्हा उच्च न्यायालय व डीआरटी कोर्ट असा कायदेशीर लढा भैरवनाथने जिंकला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाचा चेंडू डीआरटी कोर्टात गेला होता त्यावर निकाल देण्यात आला आहे. 

  औरंगाबाद उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरु असताना तेरणाची पुन्हा निविदा काढण्याचा व भैरवनाथ यांना त्यांनी भरलेली ५ कोटी रुपयांची रक्कम ८ टक्के दराने परत करण्याचा डीआरटी कोर्टचा आदेश उच्च न्यायलयाने रद्द केला होता.    

    उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला तेरणा साखर कारखाना आगामी २५ वर्षासाठी आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ शुगरला देण्यात आल्याने तेरणा साखर कारखाणा आ.तानाजीराव सावंत आगामी गळीत हंगामात सुरु करतील. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व कारखाना कर्मचारी अनंद व्याक्त करीत आहेत.

No comments:

Post a Comment