१० हजार जनकल्याण सेवक पोहचविणार नागरीकांपर्यंत लोक कल्याणकारी योजना : आ.राणाजगजितसिंह पाटीलदेशातील गोरगरीब, दीन - दुबळ्या, सर्वसामान्य लोकांना सन्मानाने जगता यावे, आत्मनिर्भर होता यावे, याकरिता आदरणीय मोदीजी अभिनव योजना राबवित असून त्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्यासाठी १० हजार जनकल्याण सेवक तयार करण्याचा संकल्प आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये आयोजित गरीब कल्याण संमेलनाच्या ऑनलाईन प्रक्षेपणानंतर लाभार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला. यावेळी उपस्थित जेष्ठ स्वातंत्र सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

गोरगरिबांच्या कल्याणासाठी पंतप्रधान मोदीजी मागील आठ वर्षापासून अविरत काम करत आहेत. लोकांची गरज ओळखून मागणी नसतानाही त्यांनी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिले, गोर गरिब महिलांचे अश्रू पुसण्यासाठी उज्वला गॅस कनेक्शन दिले, मोफत धान्य दिले, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून छोटे व्यावसायिक, फेरीवाल्यांना उभारी देण्यासाठी विना तारण कर्ज दिले. आज देशातील लाखो कुटुंबांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेत हक्काच्या पक्क्या घरांमध्ये प्रवेश केला आहे. गरीबांच्या कल्याणासाठी मोदीजी अहोरात्र काम करत असून ते खऱ्या अर्थाने कर्मयोगी आहेत.

कोविडच्या कठीण प्रसंगात सर्व वर्गातील देशवासियांना त्यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी दिलेल्या मोफत लसीमुळेच आज आपण सर्वजण एकत्र बसू शकलोत. देशातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अनेक युवकांनी लाभ मिळविला असून अनेकांचे प्रस्ताव बँकेत दाखल झाले आहेत. जिल्हयातील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन आपण १५०० नवीन उद्योग व्यवसायचे ठेवलेले लक्ष ३००० पर्यंत वाढवले आहे. मुद्रा योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, आत्मनिर्भर भारत  अशा विविध योजनांच्या माध्यमातून व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोदीजींच्या योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवुन प्रत्येकाला लाभ मिळवून देण्यासाठी १० हजार जनकल्याण सेवक तयार करण्यात येणार आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहविण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब उपस्थित लाभार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले.

यावेळी जेष्ठ स्वातंत्र सैनिक श्री विष्णुपंत धाबेकर, बुबासाहेब जाधव, भास्कर नायगावकर, तेरणा कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रांजल शिंदे, तहसीलदार श्री गणेश माळी, गट विकास अधिकारी श्री शेरखाने, सहायक गट विकास अधिकारी श्री तायडे यांच्यासह बहुसंख्येने लाभार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment