उस्मानाबादसह सोलापुर येथील चोरीच्या मालासह आरोपी ताब्यात


बेंबळी - चिखली , ता.जि.उस्मानाबाद येथील संभाजी शिवाजी सुरवसे हे दि. 01.06.2022 रोजी रात्रौ आपल्या घरात झोपलेले असताना अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीस असलेली खिडकी उघडुन घरात प्रवेश करुन त्यांचे लोखंडी कपाटातील सुवर्ण दागिने व 1,80,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 2,55,000 ₹ किंचा माल घरफोडी करुन चोरुन आहे. यावरुन संभाजी शिवाजी सुरवसे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत बेंबळी पो.ठा. येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासात मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व उस्मानाबाद विभागाचे मा.पोलीस उप अधीक्षक श्री.कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- श्री.मच्छिंद्रनाथ शेंडगे, पोउपनि- श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ-नवनाथ बांगर, पोना- रविकांत जगताप, सुनिल इगवे, पोकॉ- विनायक तांबे, सचिन कोळी यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे-अक्षय बाळु शिंदे, वय 25 वर्षे, रा. सुंभा, ता.जि.उस्मानाबाद यास काल दि. 28 जून रोजी कोंड, ता.जि.उस्मानाबाद येथुन ताब्यात घेउन वरील नमूद गुन्ह्याच्या अनुशंगाने कसून व कौशल्यपुर्ण तपास केला. यात त्याने गुन्हा केल्याची कबुली देउन त्याच्याकडून गुन्ह्यातील 10 ग्रॅम सुवर्ण दागिने तसेच होंडा युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकलीही जप्त केली. या मोटारसायकलीच्या इंजन व सांगाडा क्रमांकाच्या आधारे माहिती घेतली आसता सदर मोटारसायकल ता.बार्शी जि.सोलापुर येथुन चोरीस गेल्यावरुन तेथील वैराग पो.ठा. येथे गुन्हा क्र. 301/ 2021 भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा दाखल आहेत. सदर प्रकरणी सोलापुर जिल्ह्यातील नमूद पोलीस ठाण्यास कळवले असुन पुढिल अधिक तपास करीत आहेत. 

No comments:

Post a Comment