माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त आरोग्य शिबीरात ४२५ पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व उपचार



उस्मानाबाद -डॉ.पदमसिंह पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन बुधवार दि.०१ जुन २०२२ रोजी, लोहटा (पश्चिम) ता. कळंब येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात लोहटा (पश्चिम) व परिसरातील सर्व वयोगटातील ४२५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन संजय आडसूळ (सरपंच) यांच्या हस्ते झाले, उदघाटक अध्यक्ष विजेंद्र अण्णा चव्हाण (विश्वस्त तेरणा पब्लीक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद), अशोकभाऊ शिंदे (विश्वस्त तेरणा पब्लीक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद), व प्रमुख पाहुणे संभाजी जाधव, उत्रेश्वर पाटोळे, सतीश चव्हाण, बाबुराव खोसे, अमोल आडसूळ, रमेश खोसे, प्रतापरावजी आडसूळ, बाळासाहेब आडसूळ, त्रयंबक यादव, उध्दव यादव, दिपक आडसूळ, गोविंद सावंत, अनंत आडसूळ, बाळासाहेब खोसे, लक्ष्मण आगाशे, सुधीर आगाशे, पांडूरंग चव्हाण, नितीन आडसूळ, ग्रामसेवक धावारे सर, तसेच सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रास्ताविक प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे यांनी केले व मार्गदर्शन संजय आडसूळ (सरपंच) यांनी केले.

यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.सुरज पवार, डॉ. ईशान पटेल, डॉ.जय पटेल, डॉ. कृष्णा लाखे, डॉ.परवीन सय्यद, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या मध्ये गावातील रुग्ण, माहिला, ज्येष्ठ नागरीक, बालके आदिनी या शिबिरामध्ये उपचार करून घेतले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजित पाटील, विनोद ओहळ (जनसंपर्क अधिकारी), नामदेव शेळके (कळंब तालुका जनसेवा केंद्र प्रमुख),  पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, अशोक मिसाळ, रवी शिंदे, नाना शिंदे, आशा कार्यकर्त्या ललिता बावणे, शानूर तांबोळी, गीताबाई आडसूळ, मंदा कदम, प्रा.प.शिपाई विनोद गायकवाड, रामेश्वर वाघमारे यांनी परीश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post