श्री.तुळजाभवानी देवीजींची अभिषेक पुजेचे ऑनलाईन पासची सुरुवात

एका पासचे 50 रुपये शुल्क, एका पासवर 5 व्यक्तींना घेता येईल अभिषेक पुजेचा लाभ


तुळजापूर, दि. 5 (प्रतिनिधी) : 

कोव्हीड-19 च्या पाश्वभूमिवर बंद करण्यात आलेले श्री.तुळजाभवानी मातेची अभिषेक पुजा श्री.तुळजाभवानी मंदीर संस्थेच्या वतीने 11 दिवसापुर्वी तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आलेली होती. त्यानंतर अभिषेक पुजेचे ऑनलाईन पध्दतीने पास वितरीत करण्याचा निर्णय मंदीर संस्थानच्या वतीने घेण्यात आला असून, त्यानुसार अभिषेक पुजेचे पास मंदीर संस्थानचे अधिकृत संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने उपलब करुन देण्यात आले आहे. तरी सर्व भाविक-भक्तांनी सदर संकेत स्थळावरुन अभिषेक पुजा पासची ऑनलाईन नोंदणी करुन अभिषेक पुजेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापूरच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री.तुळजाभवानी देवीजींची विधी व न्याय विभाग तसेच पुरातत्व विभाग यांचेकडून प्राप्त होणा­ऱ्या निर्देशाचे अनुपालन करणेचे अधीन राहून दि. 24 मे 2022 रोजीपासून तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आलेल्या अभिषेक पुजेचे ऑनलाईन पध्दतीने पास दि. 6 जून पासून वितरीत करण्यात येत आहे.

सदरचे वितरीत करण्यात येणारे अभिषेक पुजेचे पास मंदीर संस्थानचे अधिकृत https://shrituljabhavani.org या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने उपलब करुन देण्यात येत असून, सर्व भाविक-भक्तांनी सदर संकेत स्थळावरुन अभिषेक पुजा पासची ऑनलाईन नोंदणी करुन अभिषेक पुजेचा लाभ घ्यावा.

श्री.देवीजींचे अभिषेक पुजेचे एका पासची शुल्क रक्कम रुपये 50 अशी असून, सदर एका पासवर कमाल 5 व्यक्तींना अभिषेक पुजेचा लाभ घेता येईल. तरी सर्व भाविक-भक्तांनी सदर संकेत स्थळावरुन अभिषेक पुजा पासची ऑनलाईन नोंदणी करुन अभिषेक पुजेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापूरच्या वतीने करण्यात आले आहे.  मंदीर संस्थानचे अधिकृत संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने अभिषेक पुजा पास सुरु केल्याबद्दल पुजारी वर्ग, देवी भक्तांबरोबर शहरवासियांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment