इम्पिरिकल डाटाचे चुकीच्या पद्धतीने संकलन समर्पित (बाठीया) आयोगाच्या विरोधात निदर्शने

 


उस्मानाबाद -

ओबीसींच्या इम्पिरिकल डाटाचे चुकीच्या पद्धतीने संकलन करण्यात येत असून त्याविरोधात निदर्शने करण्यात आली. समर्पित  सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इम्पेरिकल डाटा दारोदार जाऊन ओ.बी.सी. ची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलीत होणे अपेक्षित होती, परंतु आयोग योग्य पद्धतीने माहिती संकलीत न करता सॉफ्टवेअर व्दारे आडनावानुसार सदोष पध्दतीने माहिती संकलीत करीत आहे. ही समस्त ओ.बी.सी. समाजाची फसवणूक आहे. सॉफ्टवेअर वर सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थीतीची माहिती जमा कर म्हणजे ओ.बी.सी समाजाचे भविष्यातील याचे कायमस्वरूपी कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. समिर्पीत आयोगा व्दारे चुकीच्या पध्दतीने होणारे चुकीचे "कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे व बी.एल.ओ., तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर "यांच्या मार्फत योग्य ती माहिती संकलीत करून शासना मार्फत मा. सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावे अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे अंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी अखिल भारतीय समता परिषद जिल्हाध्यक्ष महादेव माळी ,आबासाहेब खोत प्रदेश सचिव ,रॉबीन बगाडे तालुका अध्यक्ष, उस्मानाबाद ,शहानवाज सय्यद शहराध्यक्ष.. उस्मानाबाद,ओबीसी महासभा प्रदेश सचिव सचिन चौधरी,

संतोष भाकरे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दत्तात्रेय पवार - तालुकाध्यक्ष ओबीसी सेल,लक्ष्मण राऊत ओबीसी तालुकाध्यक्ष , प्रकाश बालकुंदे उपाध्यक्ष ओबीसी, दिलीप राऊत तालुका संघटक इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment