राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौकाच्या सुशोभिकरणासाठी आ. कैलास पाटील यांच्या आमदार निधीतून २५ लाखांचा निधी

 


उस्मानाबाद - राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौकाच्या सुशोभिकरणासाठी मागील दहा वर्षांपासून विविध पध्दतीने मागणी करण्यात येत होती.  उस्मानाबाद कळंब  आमदार  कैलास घाडगे पाटील यांनी या चौकाच्या सुशोभिकरणासाठी तब्बल 25 लक्ष रूपये निधी स्थानिक आमदार निधीमधून दिला. उस्मानाबाद शहराचे मुख्य प्रवेशव्दार असललेल्या चौकाच्या  सुशोभिकरण कामाचे 26 जुन 2022 रोजी भुमी पुजन करण्यात येणार आहे. या कामासाठी सातत्याने राजर्षी शाहू महाराज स्मारक समितीच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. त्या अनुषंगाने आज खऱ्या अर्थाने यश आलेले आहे व या कामास सुरूवात होत आहे. स्मारक समितीच्या वतीने आमदार श्री. कैलास (दादा) घाडगे पाटील यांचे जाहीर आभार मानण्यात आले.

या निधीचे पत्र घेताना एम. डी. देशमुख सर, महादेव माळी, पृथ्वीराज चिलवंत, भालचंद्र कोकाटे, राहुल काकडे, राम मुंडे प्रदिप सुर्यवंशी, शुभम मुंडे, अदित्य पाटील, बिलाज रजवी, महेश उपासे, अभिजीत सुर्यवंशी, आनंद जगताप, राहुल गवळी, आकाश मुंडे, संदिप पवार, अभिजीत सुर्यवंशी, राहुल जगताप, निलेश जाधव, बालाजी तांबे, राजसिंह राजे निंबाळकर, सोमनाथ गुरव, स्वप्नील शिंगाडे, ओम सुर्यवंशी आदि समितीचे सदस्य उपस्थित होते.
No comments:

Post a Comment