आरोग्य कर्मचाऱ्यांना गाव गुंडापासून सुरक्षा मिळावी मागणीचे आरोग्य कर्मचारी महासंघाच्या वतीने दिले निवेदन
उस्मानाबाद - मागील सहा महिन्यापासून जिल्हा रुग्णालय येथे गावगुंडांची गुंडागिरी वाढत चालली आहे रात्री अपरात्री दारू पिऊन गावगुंड रुग्णालय मध्ये येऊन ड्युटीवर असलेल्या कर्मचारी यांना मारहाण करणे नर्सेस ला त्रास देणे कर्मचाऱ्यांना पैश्याची मागणी करणे आरोग्य सेवेत व शासकीय कामात अडथळा निर्माण करणे हे अमानवीय कृत जिल्हा रुग्णालय येथे चालू आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे आरोग्य कर्मचा-यांना प्रशासनाकडून कसलाही सुरक्षा नाही आरोग्य कर्मचाऱ्यांची अडचणी कुणीही ऐकण्यास तयार नाही. याचा आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोणा काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस आरोगय सेवा दिली आहे आज त्याच आरोग्य कर्मचा-यांना गाव गुंडापासुन सुरक्षा मागावी लागत आहे. मागील महिन्यात दि. १२ मे रोजी रात्री ११:१५ वाजता एक गांवगुंडने आरोग्य कर्मचारी बाबा पवार यांना दारु पिऊन विनाकारण माहरहाण केली होती आणि पुन्हा काल सायंकाळी ६:३० वाजता अशोक बाबुराव सुरडकर या आरोग्य कर्मचाऱ्याला दुसऱ्या एक गावगुंडाने ऑन डियुटीवर मारहाण केली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे तरी पुढील पंधरा दिवसांत आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करावी अन्यथा संघटनेच्या वतीने जिल्हाभरात काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष जावेद शेख,संजय भुतेकर,बालाजी म्हेत्रे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment