देवळाली येथील गुंड प्रवृत्तीच्या श्रीहरी बापू कडके याची एक वर्षासाठी स्थानबद्धता

 


उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : देवळाली येथील गुंड प्रवृत्तीच्या श्रीहरी बापू कडके उर्फ बापू वय 26 वर्षे, याच्यावर जिल्हाभरात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वास्तव्यामुळे समाजात दहशत निर्माण होत असल्याने त्यास स्थानबध्द करण्याकामी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावास मा. जिल्हाधिकारी यांनी आज दि. 08 जून रोजी मान्यता देउन ‘महाराष्ट्र झोपडपट्टी, गुंड व विघातक कृत्यांना आळा घालने अधिनियम’ कलम- 3 (2) अंतर्गत कडके याची एक वर्षासाठी स्थानबध्दता मंजुर केली आहे. यावर पोलीसांनी आज तात्काळ कडके यास ताब्यात घेउन त्याची रवानगी ‘हर्सुल मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद’ येथे केली आहे.

No comments:

Post a Comment