सलगरा येथील जि.प. शाळा सुरू, विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत


सलगरा,दि.१५ (प्रतिक भोसले)

आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल १ हजार ८३९ शाळांची घंटा आजपासून वाजली आहे. नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासोबतच ६ लाख ९४ हजार १६८ पाठ्यपुस्तके जिल्ह्यातील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी वितरीत करण्यात आले. त्याच अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून करण्यात आले. सध्या विस्तार अधिकारी हे दौऱ्यावर असल्याने त्यांच्या हद्दीतील सर्व शाळांना भेटी देत आहेत. अशीच भेट सलगरा जिल्हा परिषद शाळेस काक्रंबा बीटचे विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे यांनी दिली. जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन शाळेची पाहणी केली. तेथील शालेय कामकाज, कार्यालयीन कामकाज या सह विवीध विषयांवर चर्चा केली. तसेच शिक्षकांच्या काही अडीअडचणी असतील त्या पण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी योग्य आणि चांगले नियोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ कशी वाढवता येईल,  हे बघितलं पाहिजे असे ते बोलताना म्हणाले. विशेष म्हणजे आज पहिला दिवस असल्याने पोषण आहारात गोड पदार्थ सुद्धा देण्यात आले ज्या मध्ये बालुशाही आणि गोड भात देण्यात आला. त्या मुळे विद्यार्थ्यांचा पहिला दिवस हा गोड झाला आहे. ज्या मुळे विद्यार्थ्यांमध्ये पहिल्याच दिवशी शाळेबद्दल गोडी निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी या अनुषंगाने गोड पदार्थ वाटप करण्यात आले होते. 

पाठ्यपुस्तकांचा विचार केला असता प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी २७५ पुस्तके, तर प्राथमिक साठी २३६ पुस्तके आली होती.  पुस्तके वाटप करताना सरपंच विष्णू वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र माळी, तात्या केदार, मुख्याध्यापक शेख जे.बी., कांबळे व्ही.टी., वाघमोडे एस. एन., तनपुरे जी.बी., क्षिरसागर आर.एन. श्रीम. शेख ए.बी., श्रीम. पवार व्ही.बी., श्रीम. डावरे पी.एस., श्रीम. आसलकर एस.एस., श्रीम. गुंड एम.बी., गाडेकर पी.एस., सनगुंदी बी.एच. कर्मचारी श्री खटके (पाटील) यांच्या सह विदयार्थी उपस्थित होते. तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खांडेकर डी.व्ही., सालपे एम.एम., इंगळे एस. बी., चव्हाण पि.डी., ठाणंबिरे बी.आर., श्रीम पोपळभट के.सी., श्रीम भक्ते, श्रीम लोभे, श्रीम ढवारे, श्रीम. बिराजदार आदी शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment