मूळ शिवसेना कोणाची? शिंदे गटातील आमदाराच्या या कृतीमुळे कळेलमहाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून त्यातील वातावरण अजूनही पूर्णपणे शांत झालेले नाही. शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी केली त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शिंदे गटातील आमदार त्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याचे सांगत ते मूळ शिवसेना आम्हीच आहोत असे सांगत आहेत. त्यामुळे नेमकी शिवसेना कोणाची? प्रश्न चर्चिला जात आहे. मात्र शिंदे गटातील आमदाराच्या एका कृतीमुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे स्पष्ट होते. आ. सदा सरवणकर यांनी आपल्या विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत इतरांनी देखील आपापल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र तो देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. शिंदे गट आपणच मूळ शिवसेना असल्याचे सांगत असेल तर तो राजीनामा त्यांनी त्या गटाकडे द्यायला हवा होता मात्र तसे घडताना दिसत नाही. कायदेशीररीत्या आणखी शिंदे गटाने शिवसेना पक्षावर दावा केलेला नाही. त्यामुळे शिवसेना कोणाची हे यावरून स्पष्ट होते.No comments:

Post a Comment