चोरीचा कांगावा, प्रथम खबरीच निघाली आरोपी!

 घरफोडीतील माल मुळ मालकास परतमुरुम - ज्या व्यक्तीने चोरीची प्रथम खबर दिली त्याच व्यक्तीने चोरीचा बनाव केल्याचा प्रकार येणेगुर येथे घडला असून याबाबत माहिती अशी की येणेगुर, ता. उमरगा ग्रामस्थ- मनिषा अजय माळी, वय 25 वर्षे या कुटूंबीयांसह दि. 17.04.2022 रोजी 01.00 वा. सु. आपल्या घरात झोपलेल्या होत्या. दरम्यान अंगात काळे कपडे व तोंडावर मास्क घातलेल्या तीन अनोळखी परुषांनी माळी यांच्या घराचा मागील दरवाजा उचकटुन आत प्रवेश केला. या आवाजाने मनीषा माळी जागी झाल्या असता त्या तीघांनी मनीषा यांना चाकुचा धाक दाखवून कपाटातील सुवर्ण व चांदीचे दागिने व 9,500 ₹ रोख रक्कम असा एकुण 3,16,035 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला होता. यावरुन मनिषा माळी यांनी मुरुम पो.ठा. येथे गु.र.क्र. 142 / 2022 हा भा.दं.सं. कलम- 392, 457 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला होता.

            गुन्हा तपासादरम्यान पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व  अपर पोलीस अधीक्षक  नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुम पोलीसांनी गतीमान तपास करुन गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा व कौशल्यपुर्ण तपास केला असता प्रत्यक्षात चोरी झालेली नसून प्रथम खबरी- मनिषा माळी यांनीच नमूद ऐवज  लपवून चोरीचा कांगावा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करुन चोरीचे दागिने जप्त केले होते. ते जप्त दागिने मा. न्यायालयाच्या आदेशाने काल दि. 13.07.2022 रोजी मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सुचनेप्रमाणे मुरुम पो.ठा. चे सपोनि- श्री. आर.एम. जगताप यांनी मनिषा यांचे सासु- सासरे- जगदेवी माळी व अरविंद माळी यांना परत केले असुन दागिने परत मिळाल्याने त्या दोघांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment