श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

 तहसीलदार समीर माने यांनी केली श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी च्या पादुकाचे पूजन


करमाळा - प्रतिनिधी

             त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूर कडे निघालेल्या श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे दोन जुलै शनिवारी दुपारी चार वाजता सोलापूर जिल्ह्यात रावगाव तालुका करमाळा येथे आगमन झाले. यावेळी श्रींच्या पादुका पूजन करमाळा तहसीलदार समीर माने पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते करण्यात आले

 दोन वर्ष कोरोना कालावधीत खंडित झालेला पालखी सोहळा यावर्षी चालू झाल्याने वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य दिसून येत होते, या पालखी सोहळ्यात 25000 वारकरी समावेशित असून त्यांच्यासोबत छोट्या छोट्या पंचेचाळीस पालक्याचाही समावेश आहे तोफांच्या सलामीत पालखींचे रावगावच्या वेशीवर आगमन होताच सरपंच दादासाहेब जाधव ग्राम विकास अधिकारी रामदास हजारे यांनी पादुका पूजन व संस्थान अध्यक्ष ह भ प भाऊसाहेब महाराज गंभीरे,पालखी चालक ह भ प मोहन महाराज बेलापूरकर, पुजारी ह भ प जयंत महाराज गोसावी यांचा सत्कार  ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला 

 वारकऱ्यांची सर्व सोय करण्यात आली असून आरोग्य विभाग महावितरण विभाग पोलीस प्रशासन यांनी चोख नियोजन करून सेवा सुविधा पुरविण्यात आल्या होत्या प्रशासनाच्या वतीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून कोरोनाची खबरदारी म्हणून रावगाव अरोग्य उपकेंद्राने सर्वतोपरी औषध उपचार व इतर स्वच्छतेची तयारी केली आहे कोरोना तपासणी बरोबरच वारकऱ्यात जनजागृती केली जात होती महावितरणचे एक पथक गावातच सक्रिय असून वीज अखंडपणे चालू राहावी यासाठी पथक परिश्रम घेत होते पोलीस स्टेशन करमाळा यांच्यावतीने योग्य व सुनियोजन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील याविषयी दक्षता घेतली यावेळी  पोलीस उपनिरीक्षक मोहोळकर,  पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी भोंग ,विस्तार अधिकारी पाटील,गाव कामगार तलाठी अनभूले, तालूकाकृषी अधिकारी संजय वाकडे, सार्वजनिक बांधकाम विभाग जाधव, पाणी पुरवठा विभाग, तालूका अरोग्य अधिकारी,माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य ,कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य ,गावकामगार पोलीस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post