ईट महावितरण कार्यालयात मनमानी कारभार, तीन दिवस अर्धा गाव अंधारात


भूम (दत्ता आहिरे)

ईट येथील विद्युत वितरण कंपनीचे 33 के.वी. कार्यालय असून याकार्यालयातील कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने मानमानी कारभार चालू आहे त्यामुळे याचा त्रास ईट परिसरातील सर्व विद्युत ग्राहकांना याचा त्रास होत आहे.

     ईट येथे मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ असल्याने नागरिकांची कामासाठी नेहमी वर्दळ असते कामे लाईटवर अवलंबून असतात सध्या विमा कंपनीचे शेतकऱ्यांसाठी पिक विमा भरवायचा आहे त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने वीज ग्राहकांना अंधारात राहावे लागत लागत आहे .ईट मधील अर्धा भाग अंधारात आहे तीन दिवसाला पासून लाईट नसताना देखील अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेत आहेत

      विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयासाठी सब इंजिनिअरिंग इंजिनियर म्हणून महिला अधिकारी काम पाहतात परंतु त्या कार्यालयात कधीच हजर राहत नाहीत त्यांचा फोन नियमित बंद असतो अशावेळी ग्राहकांना लाईन म्हणून कडे तक्रारी करावी लागते परंतु लाईनमन अधिकाऱ्यांच्याही पुढचे असल्याचे दिसून येते ग्राहकांनी लाईन मानला विचारले असता ते म्हणतात मॅडमला फोन करा इट विभागाचे लाईनमन खांडेकर यांना याबाबत विचारले असता तीन दिवसापासून लाईट नसल्याचे सांगताच त्यांच्याकडून ग्राहकांना कामकाजाबाबत उत्तर हवे असते परंतु सदर उत्तराऐवजी आम्ही पडलेला पोल उभा करण्याच काम आमचे नाही ते गुत्तेदाराचेआहे मॅडमला विचारा असे उत्तरे देऊन हात झटकातात ईट विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची मिलीभगत काम करत असून ग्राहकांना वेठीस धरत असल्याचे दिसून येते. वितरण कंपनीचे अधिकारी कामाकडे लक्ष न देता खाजगी कामाकडे जास्त तर सार्वजनिक कामाकडे दुर्लक्ष करताना दिसतात कर्मचारी वर्ग  खाजगी लोकांचे कामे करून हजारो रुपये ग्राहकाकडून उकळत असलेले दिसून येत आहे कर्मचाऱ्यांना कार्यालयात कामाकडे वेळ नाही तर खाजगी कामाला प्राधान्य देत असतात मुख्य कार्यालय हजर नसतात या ठिकाणी कर्मचारी केव्हाही कधीही कार्यालयात ये जा करतात व थांबत नाहीत याचा सर्व त्रास ग्राहकांना बसत आहे.

No comments:

Post a Comment