खा. संजय राऊत यांच्या घरावर ई डी चा छापा


शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्या घरावर ई डी ( अंमलबजावणी संचालनालय) ने छापा मारला असून आज सकाळी (३१ जुलै) पासून त्यांची चौकशी सुरू आहे. संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरासमोर शिवसैनिक देखील जमले असून त्यांनी घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तसेच संजय राऊत यांनी तीन वेगवेगळे ट्विट केले असून ते देखील चर्चेत आहेत. खा. संजय राऊत गेल्या काही काळात केंद्र सरकार विरोधात जोरदार टीका करत आहेत. महाविकास आघाडी सरकारची स्थापना करण्यात त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. शिवसेनेतील बंडा नंतर देखील ते शिवसेनेची बाजू भक्कम पाने मांडत आहेत. उद्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तानाट्या संदर्भात सुनावणी आहे. तत्पूर्वीच खा. संजय राऊत यांच्या घरावर धाड पडल्याने चर्चेला उधाण आले आहे.

No comments:

Post a Comment