दैनिक जनमत : सलगरा, गंधोरा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Wednesday, August 17, 2022

सलगरा, गंधोरा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहणसलगरा,दि.१७ (प्रतिक भोसले) - 

 यंदाच्या स्वातंत्र्य महोत्सवी वर्षानिमित्त तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) आणि गंधोरा येथे सोमवार, दि.१५ ऑगस्ट रोजी ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. सलगरा येथे अमृत महोत्सवानिमित्त गावातील ग्रामपंचायत, जि.प. शाळा, प्रा आरोग्य केंद्र, महाविद्यालय, बँक, अंगणवाडी यांसह घरोघरी तिरंगा फडकावून सलगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होऊन हातात तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी गावातून भव्य अशी रॅली काढली, यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' उपक्रमांंतर्गत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 'हर घर तिरंगा' या कार्यक्रमाला मान्यता दिली होती. या अंतर्गत सर्व भारतीयांना त्यांच्या घरी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले होते. देशभर हा उपक्रम घराघरात पोहचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकराने विविध शाळा, महाविद्यालये, संस्थाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम सुद्धा घेतले होते. म्हणुन १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये देशभरात “हर घर तिरंगा’’ म्हणजेच ‘घरो घरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. म्हणून त्याच अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) आणि गंधोरा येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांंतर्गत प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करायची होती. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये या साठी ध्वजसंहितेचे काटेकोरपणे पालन करून या उपक्रमांतर्गत गावातील प्रत्येक नागरीकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी करून 'हर घर तिरंगा' अर्थात 'घरो घरी तिरंगा' या उपक्रमात भारतीय नागरीक म्हणून सक्रिय सहभाग नोंदवून हा उपक्रम निष्ठेने पार पाडायचा असे आवाहन दोन्ही गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून करण्यात आले होते. त्या नुसार शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत विविध ठिकाणी ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणासह घरोघरी तिरंगा फडकवण्यात आला.


कांदा अनुदान (३५०₹) मिळण्यासाठी या आहेत अटी शर्ती

 चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदा...