ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा सुरू करा शिवराज्याभिषेक सोहळा समितीची मागणी

 उस्मानाबाद - शहरातील ट्रॅफिक सिग्नल्स सुरू करणे तसेच शहरातील रस्ते खड्डे मुक्त करावे या मागणीचे निवेदन शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. आहे निवेदनात म्हटले आहे की गेल्या चार वर्षापासून  शहरातील ट्रॅफिक सिग्नल्स हे बंद अवस्थेत आहेत. शासनाने लाखो रुपये खर्च करून वाहतुकीचे नियमन करण्यासाठी, वाहतूक यंत्रणा सुरळीत होण्यासाठी ट्रैफिक सिग्नल ची उभारणी करण्यात आलेली आहे. परंतु नगर परिषदेच्या ढिसाळ कामकाजामुळे सदरचे ट्रैफिक सिग्नल्स बंद आहेत. यामुळे शहरांमध्ये दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. ट्रैफिक सिग्नल बंद असल्यामुळे अपघात होऊन जनतेच्या जीवित व वित्त हानी होत आहे. जनतेच्या व वाहतुकीच्या सोयीसाठी बसवलेली ही ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा खेळणी म्हणून उभी आहे. तसेच शहरातील बन्याच भागातील रस्त्यावर खूप खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यामुळे सामान्य नागरिक, लहान मुले, शाळकरी विद्यार्थी वयोवृद्ध, स्त्री-पुरुष नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. या खड्ड्यामुळे देखील शहरात दररोज अपघात होत आहेत या सर्वांची जबाबदारी नगरपरिषदेची आहे असे निवेदनात म्हटले आहे

तरी नगरपरिषद यांनी तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन गंभीरपणे विचार करून शहरातील ट्रैफिक सिग्नल सुरु करावे. तसेच शहरातील खड्डे मुक्त रस्ते जनतेला द्यावेत ही मागणी आहे ही मागणी पूर्ण झाली नाही तर समितीच्या वतीने आंदोलन करण्यात  येईल असा इशारा दिला आहे.

या निवेदनावर शिवराज्याभिषेक सोहळा समिती अध्यक्ष शशिकांत खुने, धर्मराज सुर्यवंशी, दत्तात्रय साळुंखे,रवि मुंढे,शतानंद दहिटणकर,कंचेश्वर डोंगरे, निशिकांत खोचरे, अमोल पवार, अच्युत थोरात,ऍड प्रशांत जगदाळे,सुनिल मिसाळ, विकास जाधव, गणेश नलावडे, आनंद जाधव, रियाज शेख, धनंजय साळुंके,अशोक गुरव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment