कारीत बैलपोळा सण उत्साहात साजरावाजत-गाजत गावातून मिरवणूक

कारी (प्रतिनिधी)

 शेतकऱ्यांना शेती कामासाठी वर्षभर साथ  देणाऱ्या लाडक्या सर्जा-राजा अर्थात बैलजोडीचा पोळा हा सण शुक्रवारी (दि२६) मोठ्या उत्साहात वाजत गाजत साजरा करण्यात आला.ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी बैल जोडीचे पुजन केले.कारी परिसरातील शेतकऱ्यांनी पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला.बैल जोडीस रंगरांगोटीसह, फुगे, झुल, चंगाळ बांधून आकर्षक सजावट करण्यात आली होती.बैलांचे पूजन करून पुरण पोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला.यावेळी बैल जोडीची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली.

No comments:

Post a Comment