सलगरा, दि.१४(प्रतिनिधी)
तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय येथे व्याख्याते तथा हिप्परगा येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भोयटे यांचे व्याख्यान पार पडले. आजच्या युगातील विद्यार्थ्यांमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विषयी माहिती असणे आजच्या तरुण पिढीला गरजेचे असून आजचा आपला विद्यार्थी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास विसरत चालला आहे त्यांना हा इतिहास माहीत असायला हवा असे व्याख्याते भोयटे हे बोलताना म्हणाले. स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय हिप्परगा या विद्यालयाचे मुख्याध्यापक व्याख्याते संजय भोयटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन चिकुंद्रा येथे करण्यात आले होते. व्याख्याते संजय भोयटे यांच्या या अभ्यासपूर्ण भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना या मुक्तीसंग्रामाचा इतिहास ज्ञात करून दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एस.पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे सहशिक्षक कानडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सहशिक्षक सत्यवान गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक भैरवनाथ कानडे यांनी केले आणि आभारप्रदर्शन महादेव गरड यांनी केले.
No comments:
Post a Comment