बापाचं सगळंच ऐकू नका आ. विक्रम काळेंचा समीर पाटलांना सल्लाउस्मानाबाद - एस. पी. शुगरचे संस्थापक असलेल्या सुरेश पाटलांच्या सुपुत्रांना शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी बापाचे सगळंच ऐकू नका असा सल्ला दिल्याने कारखान्याच्या सभासदांमध्ये तडवळा पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

एस. पी शुगरच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी कोणी तरी एस. पी. शुगर शेतकऱ्यांना योग्य भाव देत नसल्याची चिठ्ठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला मात्र ती चिठ्ठी आ. विक्रम काळेंच्या हातात लागली आणि त्यांनी भाषणात समीर पाटील यांना ऊस गाळा, गूळ तयार करा किंवा आणखी काही करा मात्र शेतकऱ्यांना योग्य भाव द्या,तुम्ही तरुण आहात बापाचं सगळंच ऐकू नका असा अजब सल्ला दिला मात्र त्याच सल्ल्यात आजच्या कार्यक्रमाचे मोजमाप दडले आहे, कारखाना ऊसाला भाव देत नसल्याची चर्चा या निमित्ताने कारखाना परिसरात सुरू होती.


जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपली प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांची मुक्ताफळे

विरोधी पक्ष नेते पवार यांनी पाटील यांना झापले

 उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपली असल्याची मुक्ताफळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस पाटील यांनी उधळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जमलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह देखील प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याने कुजबूज सुरू झाली. दरम्यान यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कधी व कुठल्या काळी पक्ष संपत नसतो. भाजपने दोन जागांच्या बळावर सुरुवात करून सत्ता मिळवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी संपली अशा पोकळ गप्पा कोणीही मारू नये असे खडावत  सुरेश पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस संपणार नाही असे सुनावत आयोजित मेळाव्यात झापले. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त मीच एकमेव एकनिष्ठ पदाधिकारी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाटलांचे सर्वासमोर पितळ उघडे पडले.

No comments:

Post a Comment